ड्रीम वेलमोरच्या १०० हून अधिक बुकिंगचा टप्पा पार; क्लब वेलमोरच्या लवकर उपलब्धतेची घोषणा
ड्रीम वर्क्स रिअल्टर्सच्या बालेवाडी हाय स्ट्रीट येथील प्रीमियम रेसिडेन्शिअल प्रकल्प ‘ड्रीम वेलमोर’चा ‘सपनों का शुभारंभ’ हा विशेष भूमिपूजन सोहळा २० ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. १०० हून अधिक बुकिंगचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्यानिमित्त आयोजित या सोहळ्यात ग्राहकांच्या हस्ते त्यांच्या भावी घराच्या जागी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ड्रीम वर्क्स रिअल्टर्स आणि फोरॲक्सिस इन्फ्रा यांचे संचालक, तसेच स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर आणि दिनेश माथवड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे क्लब वेलमोर रहिवाशांना त्यांच्या घराचा ताबा मिळण्यापूर्वी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनाची घोषणा. घराचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच रहिवाशांना क्लब हाऊस आणि त्यातील सुविधांचा अनुभव घेता यावा, या ग्राहककेंद्रित दृष्टिकोनातून हा उपक्रम आखण्यात येत आहे. यामुळे घराच्या ताब्यापूर्वी ड्रीम वेलमोरच्या जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी रहिवाशांना मिळू शकणार आहे.
या प्रसंगी ड्रीम वर्क्स रिअल्टर्सचे श्री. नरेंद्र बालवडकर म्हणाले, “प्रत्येकाचे घेतलेल्या घराशी एक भावनिक नातं जोडलेलं असतं. घर मिळेपर्यंत हे नातं तितकं च दृढ आणि जिवंत राहावं, यासाठीच आम्ही आमच्या सर्व १०० ग्राहकांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला. घर बांधण्याची प्रक्रिया ही केवळ बांधकामापुरती मर्यादित नसते, तर ती ग्राहकांच्या स्वप्नांना आकार देण्याची प्रक्रिया असते. या संपूर्ण प्रवासात ग्राहकांना सहभागी करून घेणं आणि त्यांचा विश्वास जपणं हे आमचं प्राधान्य आहे.”
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या सोहळ्याचा उद्देश केवळ प्रकल्पाच्या यशाचा आनंद साजरा करणे नव्हता, तर ग्राहकांनी ड्रीम वेलमोरवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हाही होता. ग्राहकांना भूमिपूजनासाठी आवश्यक साहित्य असलेले विशेष पूजा किट देण्यात आले. तसेच, या संस्मरणीय क्षणांच्या आठवणी जपण्यासाठी खास छायाचित्रांची व्यवस्थाही करण्यात आली होती.
बालेवाडी हाय स्ट्रीट येथे विकसित होत असलेला ड्रीम वेलमोर हा चार एकरांवर विस्तारलेला प्रीमियम रेसिडेन्शिअल प्रकल्प आहे. या प्रकल्पात ३ आणि ४ बीएचके आलिशान घरे ज्यात ४ बीएचकेच्या लिव्हिंग रूमची उंची २२ फूट आहे. ६० टक्के मोकळी जागा, ५०,००० चौरस फुटांचे चार मजली क्लब हाऊस, ४० हून अधिक लाइफस्टाइल अॅमेनिटीज आणि प्रकल्पाला लागून असलेले ३०,००० चौरस फुटांचे मैदान अशा वैशिष्ट्यांचा समावेश ड्रीम वेलमोरमध्ये आहे.
ड्रीम वर्क्स रिअल्टर्ससाठी ‘सपनों का शुभारंभ’ हा सोहळा ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करणारा ठरला. १०० हून अधिक बुकिंगचा टप्पा पार करताना ग्राहकांचा विश्वास, सहभाग आणि समाधान यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. ग्राहकांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनापासून ते क्लब वेलमोर घराच्या ताब्यापूर्वी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनापर्यंत, या उपक्रमातून ग्राहकांना केवळ घर नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीचा अनुभव देण्याचा ड्रीम वर्क्स रिअल्टर्सचा दृष्टिकोन अधोरेखित झाला.
‘सपनों का शुभारंभ’ ही संकल्पना अशा प्रकारे केवळ नव्या घरांच्या प्रवासाची सुरुवात न ठरता, विश्वास, आपुलकी आणि एका नव्या समुदायाच्या निर्मितीचा उत्सव ठरली.